मुक्ताईनगर– :तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील तरुण विजय दिनकर डहाके वय 40 याने बॅनर काढल्याच्या कारणावरून अपहरण केल्याची घटना 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान सदर तरुणाचे प्रेत 7 रोजी चार वाजेच्या सुमारास सारोळा शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून मुक्ताईनगर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
फिर्यादी ज्ञानदेव दिनकर डहाके वय 30 राहणार निमखेडी खुर्द व्यवसाय शेती यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक पाच सप्टेंबर 2021 रोजी सायंकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास भाऊ विजय डहाके दारू पिण्यासाठी सारोळा नवीन वसाहत येथे गेला व दारू पिऊन गावाचे बस स्टॅन्ड जवळ आला. त्याने गावात लावलेले बॅनर फाडले असे लक्ष्मण भिका कोळी, अजय लक्ष्मण कोळी यांनी फिर्यादी ला सांगितले. या कारणावरून लक्ष्मण कोळी ,अजय कोळी, अरुण गायकवाड ,विलास बेलदार ,रतन सुरवाडे सर्व राहणार सारोळा यांनी फिर्यादीच्या भावास मारहाण केली. दरम्यान या संदर्भात फिर्यादीने अधिक सखोल चौकशी केली असता विजय डहाके याने बॅनर फाडले नव्हते अशी माहिती मिळाली. दरम्यान लक्ष्मण कोळी व अजय कोळी यांनी फिर्यादीस सांगितले की,आम्ही तुझ्या भावास थोडी मारहाण करून काही अंतरापर्यंत नेल्यावर सोडून दिले. परंतु त्यानंतर तो घरी 5 सप्टेंबर तारखेपासून परतलाच नाही.दरम्यान या गुन्ह्यात आरोपींनी फिर्यादीच्या भावास डांबून ठेवण्याचा संशय फिर्यादी व त्याच्या नातेवाईकांना आल्यानंतर त्यांनी मुक्ताईनगर पोलिसात 6 रोजी अपहरण झाल्याचे तक्रार व गुन्हा दाखल केलेला होता.
दरम्यान 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अपहरण झालेला विजय दिनकर डहाके वय 40 याचे याचा मृतदेह सारोळा शेती शिवारात संतोष सुरवास यांचे शेतात पाणी फिल्टर प्लांट जवळ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतदेह आढळून आल्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक लावंड, भुसावळचे पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाकचौरे, पोलिस निरीक्षक राहुल खताळ, बोदवड चे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड पोलीस उपनिरीक्षक प्रदिप शेवाळे,बोडवड चे माळी,वरणगाव चे अडसूळ आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळ गाठले होते.