चोपड्यात दिवसा 15 लाख रुपयांची बॅग लुटली,चोरटे बॅग घेऊन पसार …! 

0
16

हेमकांत गायकवाड

चोपडा :– शहरातील बस स्थानका जवळील राम मंदिर चौक परिसरात काही अज्ञात चोरट्यानी शहरातील व्यापारी मनोज अग्रवाल यांचा कर्मचारी संजय पालिवाल याने आय डी बी आय बँकेतून काढून आणलेले १५ लाख रुपये असलेली कापडी पिशवी अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून उचलून नेत पोबारा केल्याची घटना आज दि ८ रोजी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास दिवसाढवळ्या घडली आहे.याने घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्यांना शोधण्यासाठी पोलिसांचे पथके वेगवेगळ्या दिशेला रवाना झाले आहेत.

सविस्तर वृत्त असे की,शहरातील लक्ष्मी जिनिंग अँड प्रेसिंगचे मालक मनोज हरसाय अग्रवाल यांच्याकडे २० वर्षांपासून कामास असलेला कर्मचारी संजय शिवदास पालिवाल (५२, रा महालक्ष्मी नगर चोपडा ) हे आज दि ८ रोजी दुपारी शहरातील बस स्टँड जवळील आडगाव ,गोरगावले रिक्षा स्टाफ जवळ असलेल्या सहकार समृद्धी इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर असलेल्या आय डी बी आय बँकेच्या शाखेत ताराचंद हरसाय अग्रवाल या नावाच्या खात्यात असलेले १५ लाख काढण्यासाठी चेक घेऊन ऍक्टिवा या दुचाकीने(एम एच सी इ १३९९)बँकेत गेले होते.बँकेतून पैसे काढल्यानंतर कापडी पिशवीत सदर रकमेची पिशवी सोबत घेऊन खाली उतरले.यावेळी संजय पालिवाल हे ऍक्टिव्हा स्कुटीवर आले होते. या गाडीच्या पुढील बाजूस असलेल्या रिकाम्या जागेत पैश्यांची पिशवी ठेवण्यासाठी वाकले असता त्यांचा गाडीच्या हँडलवरील हात सटकला आणि ते काही सेकंदासाठी खाली वाकल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी १५ लाख असलेली कापडी पिशवी सिनेस्टाईल पळवली असून घडलेल्या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पैश्याची पिशवी घेऊन पसार होणारे चोरटे बँकेच्या खाली असलेल्या किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले असून त्याच्या मोटार सायकलीचा नंबर स्पष्ट दिसत नसल्याने चोरट्यांना

अटक करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

जवळपास वीस वर्षांपासून जिनिगमध्ये कामाला असलेले पालिवाल हे आज नेहमी प्रमाणे पैसे काढण्यासाठी बँकेत आले होते. दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले पंधरा लाख रुपये पिशवीत ठेऊन खाली उतरले. आणि १५ लाखांची पिशवी लुटीची घटना घडली.घडलेल्या घटनेनंतर पोलीस उपविभागीय अधिकारी राकेश जाधव, शहर पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही ची पाहणी करून वेगवेगळ्या दिशेला पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती मिळाली आहे.रात्री उशिरापर्यंत पोलिसात गुन्हा दाखल झाला नव्हता.

काही वर्षांपूर्वी अशीच घटना घडली होती त्याचीच पुनरावृत्ती झाल्याची चर्चा शहरात सर्वत्र सुरू आहे.पुढील तपास पोहेकॉ सुनील पाटील,पोकॉ रवींद्र पाटील हे करीत आहे.

Spread the love