हेमकांत गायकवाड
चोपडा : डॉ एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन तर्फे कलाम सर यांच्या ६ व्या स्मृती दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर आयोजित चित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालय येथील कु पूर्वजा भूपेंद्र पाटील- देशात प्रथम क्रमांक ( ग्रुप A ) व
कु. हेमाक्षी भूपेंद्र पाटील – देशात तिसरा क्रमांक ( ग्रुप A ) मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. त्या
उपक्रमशील शिक्षक भूपेंद्र पाटील यांच्या या कन्या आहेत.
एकाच कुटुंबात देश पातळीवरील चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे तसेच तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाल्याबद्दल दोन्ही बहिणींचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन जळगाव, जिल्हा कोअर कमिटी अध्यक्ष डॉ.ज्योती महाजन , राज्य समन्वयक मनिषाताई चौधरी ,तसेच चोपडा तालुका समन्वयक विजया पाटील यांचे आँनलाईन ड्रॉइंग स्पर्धेविषयी दोन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले. YouTube live कार्यक्रमाद्वारे मिलिंद चौधरी जनरल सेक्रेटरी AKIF Foundation यांचे (Innovation by young Minds competition) इनोवेशन बाय यंग माईड स्पर्धेविषयी, १५ सप्टेंबर २०२१ पर्यंत होणाऱ्या स्पर्धेच्या रजिस्ट्रेशन विषयी विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.