जंगलात पोत्यात बांधलेला आढळला मृतदेह; दुर्गंध पसरल्याने आले उघळकीस

0
42

जामनेर – जामनेर बोदवळ रोड लहासर परिसरातून आज प्रकरण समोर आलं आहे. लहासर जंगलात सोमवारी दुपारी पोत्यात बांधलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळल्याने जामनेर तालुक्यात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच जामनेर पोलीस घटनास्थळी पोहोचले.लहासर शिवारातील जंगलात १७ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुराखी गुरे चारत होता. या वेळी तेथे त्याला दुर्गंधी आली. त्याने आजूबाजूला पाहिले असता एक पोत्यातूनच ही दुर्गंधी येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. हा प्रकार त्याने गावात कळवला.

ग्रामस्थांनी लगेच पोलीस ठाण्याची संपर्क साधला. त्यानंतर पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत तत्काळ घटनास्थळ गाठले. बांधलेले पोते उघडून बघितले असता त्यात मृतदेह आढळून आला. मयत प्रौढाचे हात-पाय बांधून पोत्यात भरून ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली. घटनास्थळी चाळीसगाव व पाचोरा येथील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. याबाबत पोलीस कर्मचारी नीलेश वासुदेव घुगे यांच्या फिर्यादीवरून जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Spread the love