सुनसगावात काही भागात दुर्गंधीयुक्त लाल रंगाचा पाणीपुरवठा!

0
46

सुनसगाव – येथील श्री खंडेराव महाराज मंदिर परिसरा समोरील काही भागात दोन दिवसांपासून दुर्गंधीयुक्त लाल रंगाचा पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरीक हैराण झाले असून नेमके अशा प्रकारचा पाणीपुरवठा कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. या बाबत ग्रामसेविका यांना समजताच त्यांनी पाणीपुरवठा कर्मचारी यांना सांगून लवकरात लवकर पाईप लाईन फुटली आहे की एखाद्या ठिकाणी नळ कनेक्शन लिक आहे हे पाहण्यास सांगितले आहे तसेच या पाणीपुरवठा कर्मचारी यांना विचारले असता दोन दिवसांपासून काही नळांना लालसर रंगाचे पाणी येत आहे तसेच आम्ही लवकरात लवकर पाईप लाईन किंवा नळ कनेक्शन लिक असेल तो भाग पाहणी करत आहे .तात्काळ दुरुस्ती करुन संबंधित नागरीकांना शुद्ध पाणी पुरवठा केला जाईल असे सांगितले आहे. या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत असल्याचे ग्रामसेविका यांनी सांगितले आहे.

Spread the love