जळगाव जिल्ह्यातील निंबादेवी धरण ओव्हरफ्लो, पर्यटकांना प्रवेश बंदी !

0
10

यावल – तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेखी धरण पावसामुळे ओव्हरफ्लो झाले आहे. या ठिकाणी पर्यटन प्रेमींची संख्या वाढत आहे.
धरण ओव्हरफ्लो झाल्याने पयर्टकांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासुन जिल्ह्यातील लाखो पर्यटक हे या आकर्षणाचे केन्द्र असलेल्या धरणाच्या ओव्हरफ्लोच्या प्रतिक्षेत होते. मागील दोन तीन वर्षांपूर्वी कोरोना प्रार्दुभावच्या काळात‌ या धरणावर पर्यटकांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी झाली होती.‌ त्यावेळीपासून यावल तालुक्यातील निंबादेवी धरण हे जिल्ह्यात प्रसिद्ध झाले आहे. मोशी डॅमची अनुभुती पर्यटकांना याठिकाणी गेल्यावर येते असे पर्यटकांचे म्हणणे आहे. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या हे धरणावर यावल, फैजपुर, किनगाव, नायगाव, चुंचाळे, कोरपावली, जळगाव, भुसावळ शहरासह विविध ठीकाणाहुन शहरी जिवनातील गर्दीतुन बाहेर पडण्यासाठी आणी निसर्गाशी जोडण्यासाठी ही एक संधी असल्याचे समजुन मोठमोठी डोंगरातुन नैसर्गीक हिरवगार झाडे व नयनरम्य पर्वतास बघण्यासाठी सहलीच्या निमित्ताने बघणाऱ्या पर्यटकांची या ठीकाणी गर्दी होत असते.

यात संपुर्ण जिल्ह्यातील भाविक श्रध्दा असल्याने या ठिकाणी आपली हजेरी लावत असुन यावल तालुक्यातील हे एक निसर्गरम्य ठिकाण म्हणुन या डॅमची गणना केली जात आहे. मागील घटनांच्या पार्श्वभुमीवर याठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असते त्यासाठी काही अप्रीय घटना टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने निंबादेवीचे पर्यटनस्थळ पर्यटकाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन धरणाच्या ठीकाणी प्रवेश बंदी करण्यात आली आहे. यावलचे पोलीस निरिक्षक राकेश मागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे, पोलीस उपनिरिक्षक अविनाश दहीफळे,पोलीस कर्मचारी आणी गृहरक्षकदलाचे महीला व पुरुष कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. नागरीकांच्या सुरक्षेतेच्या दृष्टीने पर्यटकांनी याठिकाणी येवु नये असे आवाहन पोलिसानी केले आहे .

Spread the love