महिला सफाई कामगाराचा विनयभंग; आरोग्य निरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा

0
51

जळगाव – नगरपरिषदेच्या महिला सफाई कामगाराचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोग्य निरीक्षक व मुकादमसह तिघांवर अमळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

महिलेने फिर्यादीत म्हटले आहे, की गेल्या सहा महिन्यांपासून आरोग्य निरीक्षक युवराज श्रीपत चव्हाण, आरोग्य निरीक्षक संतोष बिऱ्हाडे आणि मुकादम ज्ञानेश्वर मंगल संदानशिव कामावर त्रास देत होते.

२७ जूनला सकाळी नऊला विनयभंग करून लोटून दिल्याने खाली पडली. त्यानंतरही तिघांनी त्रास देणे सुरूच ठेवले. तिघांनी १३ जुलैला शिस्तभंगाची नोटीस दिली.

याबाबत मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार दिली आहे. यावरून अमळनेर पोलिस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक योगेश ढिकले तपास करीत आहेत.

Spread the love