‘महसूल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी’ लिपिक अडकला लाचेच्या जाळ्यात

0
55

जळगाव – रेशन कार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागून ती स्वीकारल्याने बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा लिपिक उमेश बळीराम दाते (वय ५५, रा. बोदवड) याला जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कार्यालयातच अटक केली आहे.

राज्य शासनाने आजपासून महसूल सप्ताह जाहीर केला आहे. आज महसूल दिनाची अंमलबजावणी सुरू असताना बोदवड तहसील कार्यालयातील पुरवठा विभागातील उमेश बळीराम दाते हा लाचेच्या जाळ्यात अडकला.

दाते याने तक्रारदाराच्या रेशन कार्डवर आईचे व मुलाचे नाव कमी करण्यासाठी व नवीन रेशन कार्ड तयार करून देण्यासाठी एक हजारांची लाच मागितली.

दरम्यान, कार्यालयातच लाच स्वीकारताना जळगाव एसीबीच्या पथकाने सापळा रचून लिपिक दाते याला अटक केली.

पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, बाळू मराठे, पोलिस कर्मचारी राकेश दुसाने आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

Spread the love