सरपंचासह दोन जणांवर गुन्हा दाखल; विकासकामे न करता 22 लाखांचा अपहार

0
11

चाळीसगाव – तालुक्यातील करंजगाव ग्रामपंचायत मध्ये 22 लाखांचा अपहार केल्याची फिर्याद दिल्यावरून न्यायालयाच्या आदेशाने माजी ग्रामसेवक,माजी सरपंच ,उपसरपंच अशा तीन जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील करंजगाव येथील सेवानिवृत्त रहिवासी गोपीचंद काशिनाथ सानप वय ६२ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, करंजगाव ग्रामपंचायतीमध्ये २००८ ते २०२३ या कालावधीमध्ये राजेंद्र केशव पाटील वय 58 सेवानिवृत्त ग्रामसेवक रा. पाटोदा ता. अमळनेर, माजी सरपंच आणि उपसरपंच नारायण झिपरू पाटील वय 61 सेवानिवृत्त रा. करंजगाव, सरपंच सागर फुला सोनवणे वय 30 यांनी संगणमताने वेळोवेळी शासनाकडून येणाऱ्या विविध योजनांची माहिती गोरगरीब जनतेला न पोहोचविता या योजनांमध्ये शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा अपहार व भ्रष्टाचार करून गोरगरीब जनतेची व शासनाची दिशाभूल करून २२ लाख १२ हजार ७११ रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याची तक्रार न्यायालयात केली होती. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाने तिघांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहे.

Spread the love