सुनसगाव येथे कृषिदुतांचे आगमन; गावातील कृषी कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दिली शेतीविषयक ॲप्स बद्दल माहिती

0
39

सुनसगाव – महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील अंतिम वर्षातील कृषिदुत ढवळे किरण, कुराडे प्रशांत, पावसे गणेश, वारीक ओंकार, नागोडे यज्ञेश, धाकड तुषार, भिलावेकर विजय यांची ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम 2023-24 अंतर्गत सुनसगाव येथे आगमन झाले, यावेळी सर्व शेतकरी व ग्रामस्थांनी कृषिदुतांचे स्वागत केले. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता जयप्रकाश गायकवाड, कृषी जागरूकता कार्यक्रमाचे चेअरमन डॉ.अविनाश कोळगे, कार्यक्रम समन्वयक डॉ. बी. डी. रोमाडे, कार्यक्रम अधिकारी डॉ.आर. एस. शेख व संबंधित विषयातील विशेष तज्ञांचे मार्गदर्शन लाभले.

विविध कृषी कार्यक्रमांतर्गत कृषी दुतांनी गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक ॲप्स बद्दल माहिती दिली. यावेळी प्रशासक कोमल सिंग राजपूत, ग्रामसेविका प्रतिभा तायडे, भाजपा तालुका अध्यक्ष भालचंद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सतीश पाटील, सुदाम भोळे, पत्रकार जितेंद्र काटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love