सुनसगाव उपकेंद्रात आयुष्यमान भव योजनेचा प्रारंभ!

0
40

भुसावळ – वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या सुनसगाव येथील उपकेंद्रात नुकतेच आयुष्यमान भव योजनेचे उद्घाटन भुसावळ भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले या निमित्ताने आयोजित शिबीरात उच्चरक्तदाब मधुमेह अशा रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी भालचंद्र पाटील तसेच सी एच ओ डॉ रुपेश पाटील यांच्या हस्ते मोफत औषधे वाटप करण्यात आले. आयुष्यमान भव या योजनेअंतर्गत असंसर्गजन्य आजार , क्षयरोग, कुष्ठरोग, व इतर संसर्गजन्य आजार तसेच माता बालक आरोग्य व पोषण सुविधा, सिकलसेल तपासणी व नेत्र चिकित्सा आरोग्य सुविधा, नाक, कान, घसा तपासणी विविध आरोग्य केंद्रात करण्यात येणार आहे, येत्या १७ सप्टेंबर पर्यंत सप्ताह सुरू राहणार आहे तसेच १७ सप्टेंबर ते २ आॅक्टोबर आयुष्यमान पंधरवडा सुरू राहणार आहे.

येथील उपकेंद्रात आयुष्यमान भव योजनेला गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असून तपासणी करून घेत आहेत. वराडसिम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल भंगाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनसगाव उपकेंद्राचे सी एच ओ डॉ रुपेश पाटील, आरोग्य सेविका विजया पाटील, आरोग्य सेवक संजय कोळी, आशा सेविका ज्योती पाटील व सुनिता काटे आणि मदतनीस शकुंतला पाटील हे परिश्रम घेत आहेत.

Spread the love