जे सी आई भुसावळ ताप्ती तर्फे मुशाळतांडा येथे भव्य आरोग्य तपासणी शिबिर व धान्य वाटप

0
43

भुसावळ – येथून जवळच असलेल्या मुशाळतांडा येथे जवळपास ७६ कुटुंब वास्तव्यास आहे,आर्थिक दृष्ट्या दुर्बल अश्या या भागात गावातील नागरिकांच्या आरोग्य संबंधी जनजागृती व्हावी व त्यांच्या आरोग्य संबंधित वेगवेगळ्या तपासणी व्हावी. म्हणून जे सी आई भुसावळ तर्फे भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.

भुसावळ येथील सुप्रसिध्द तज्ञ सात डॉक्टर च्या सहकार्याने ही तपासणी करण्यात आली.या शिबिरात डोळ्यांची तपासणी,त्वचा रोग संबंधी तपासणी,लहान मुलांची बालरोगतज्ञ कडून तपासणी, स्त्रियांची स्त्री रोगतज्ञ कडून तपासणी व दंत रोग तपासणी पण करण्यात आली.*

या शिबिरात तांड्यातील नागरिकांची डोळे तपासण भुसावळ येथील डॉ समीर चौधरी यांनी केली.ज्यांना आवश्यक आहे अश्या व्यक्ती ला डोळ्यात टाकण्याचे औषध देण्यात आले तसेच तपासणीत १५ मोतीबिंदू चे पेशंट निघाले. या सर्वांची पुढील उपचाराची जवाबदारी क्लब ने घेतली असून त्यांचा ऑपरेशन ची जवाबदारी रोटरी क्लब ने स्वीकारली आहे.

स्त्रियांची तपासणी सुप्रसिध्द डॉ दीपा रत्नांनी यांनी केली तसेच त्यांना स्त्री आरोग्य संबंधी महत्वपूर्ण माहिती व मार्गदर्शन केले तसेच आवश्यक औषध वाटप सुद्धा करण्यात आले.

बाल रोग तज्ञ डॉ तेजल राणे यांनी लहान मुलांची तपासणी केली असताना सद्या मुलांना सर्दी, खोकल्या चां त्रास जाणवला व संबंधित मुलांना कफ सिरप व आवश्यक गोळ्यांचे वाटप करण्यात आले. त्वचा रोगतज्ज्ञ डॉ प्रणिता कोळंबे यांनी मुले,स्त्रिया व पुरुष यांची तपासणी केली व आवश्यक असलेली औषधी व लोशन चे वाटप करण्यात आले. क्लबच्या सदस्या डॉ मोनिका अग्रवाल व डॉ सोनल जवर यांनी दंत तपासणी केली.

या तपासणी शिबिरात तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संगीता दवंगे प्राथमिक आरोग्य केंद्र वराडसिम अंतर्गत वैद्यकिय अधिकारी डॉ अमोल भंगाळे तसेच आरोग्यसेविका,आरोग्य सेवक,आरोग्य सहायक,आणि उपकेंद्रातील सर्व आरोग्य समूदाय अधिकारी यांचे तसेच डॉ कीर्ती चांडवडकर, दीपक सुरवाडे, .राजू राठोड, सोनू भाऊ मांडे यांचे सहकार्य लाभले.

क्लबच्या वतीने दरवर्षी एक मुट्ठी अनाज .हा प्रकल्प घेण्यात येतो ज्यात क्लबच्या सर्व सदस्य आपापल्या परीने स्वेच्छेने धान्य देतात व एकत्रित धान्य गरजूंना वाटप करण्यात येते या वर्षी सुद्धा सर्व सदस्याने उत्साहाने या प्रकल्पात सहभाग नोंदवला व भरपूर धान्य एकत्रित झाले.या धान्य चे वाटप मुशाळ तांडा येथील ७६ कुटुंब व भिलमळी येथील कुटुंब असे एकूण १०० कुटुंबांना गहु तांदूळ, साबुदाणा, साखर, डाळ व गूळ चे पेकेट देण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रासताविक अध्यक्षा रजनी सावकारे यांनी तसेच सूत्र संचालन व आभार मोरे सर यांनी केले

उपक्रमला जयश्री अग्रवाल, ज्योती दरगड, पल्लवी झोपे, सुनीता दरगड, स्मिता बियाणी, संगीता अग्रवाल, डॉ सोनल जवर, डॉ मोनिका अग्रवाल, सुचित्रा अग्रवाल यांनी परिश्रम घेतले

Spread the love