पोळ्या निमित्ताने दसनुरला बारागाडया उत्साहात पार पडल्या

0
20

रावेर – दसनुर येथे पोळयाच्या पाडव्याला शुक्रवारी तसेच शनिवारी दोन दिवस उमेश्वर महादेवाचा यात्रोत्सव उत्साहात पार पडला.

यात्रोत्सवानिमित्त सायंकाळी भगत बाळू कोळी यांनी बारागाड्या ओढल्या त्यांना बगले प्रभाकर कोळी,दिपक चौधरी, यांनी साथ दिली बारागाडया ओढण्याआधी गावातील देवीदेवतांना नैवेद्य दाखविण्यात येवून पूजा करण्यात आली.यात्रेत खादयपदार्थ, खेळणी तसेच विविध व्यावसायिकांची संसारोपयोगी वस्तूंची दुकाने थाटली होती.

यंदा दोन दिवस यात्रोत्सव असल्याने यात्रोत्सवातील गर्दीही वाढली होती. निंभोरा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरिक्षक गणेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला यात्रोत्सव यशस्वीतेसाठी सरपंच भारती महाजन, उपसरपंच मयूर महाजन, महेश चौधरी, पोलिस पाटील दिपक चौधरी, तुकाराम महाजन, विशाल पाटील, शामा कोळी, आनंदा महाजन,अशोक पाटील, त्रंबक चौधरी, हेमंत चांदवे, भागवत महाजन, राहूल महाजन, होमगार्ड विजय चौधरी ग्रा.पं सदस्य यांचेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Spread the love