भुसावळ येथील गणेश बारसे यांचा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा सत्काराचा उपक्रम !

0
41

भुसावळ – भुसावळ येथील वाल्मिकी मेहतर समाजाच्या महाराष्ट्र सचिव पदी सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बारसे यांची नियुक्ती झाली. त्यामुळे गावोगावी तसेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना सत्कारासाठी बोलाविण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बारसे यांनी आवाहन केले की सत्कार करायचा असेल तर अवाढव्य खर्च करू नका फक्त एक गुलाबाचे फुल आणि त्या सोबत समाजातील विद्यार्थ्यांसाठी वह्या आणि शैक्षणिक साहित्य द्या जेणेकरून आपल्या समाजातील विद्यार्थ्यांसाठी हे साहित्य वाटप करता येईल. त्यामुळे भुसावळ, यावल, निंभोरा, वाघोदा, सावदा, वडगाव, रावेर, नशिराबाद आणि अनेक ठिकाणी त्यांचा सत्कार केला असता ‘मुझे सत्कार मे सिर्फ शालेय साहित्य चाहिए’ असे सांगितले .

त्यामुळे मोठ्या प्रमाणात हजारोंच्या संख्येत वह्या व शैक्षणिक साहित्य गोळा होत आहे हे साहित्य मेहतर वाल्मिकी समाजातील विद्यार्थ्यांसाठी वाटप करण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते गणेशजी बारसे यांनी जळगाव संदेश शी बोलताना सांगितले.

Spread the love