चोपडा भाजपा व ओबीसी मोर्चा कडून ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण रद्द करणार्‍या म.वि.आघाडी सरकार विरोधात भव्य राज्यव्यापी धरणे व निदर्शने आंदोलन संपन्न.

0
43

हेमकांत गायकवाड

चोपडा -दि.15 सप्टेंबर 2021,बुधवार रोजी,सकाळी 11 ते 12 वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चोपडा भाजपा कडून ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी आंदोलन संपन्न झाले,

राज्य निवडणुक आयोगाने धुळे,नंदुरबार,वाशिम,अकोला,व नागपूर जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणाशिवाय पोटनिवडणुका जाहिर केल्यात याला सर्वस्वी राज्यातील तिन पक्षीय आघाडीचे सरकार जबाबदार सरकार आहे, ओबीसी समाजाच्या पाठीत खंजिर खुपसला आहे,

भारतीय जनता पार्टीने मागील सहा महिन्यापासुन ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण पुन्हा मिळण्यासाठी विविध प्रकारचे राज्यव्यापी आंदोलने करुन,निवेदने देवून राज्य सरकारकडे दाद मागितली,लक्ष वेधले परंतू त्यांनी दुर्लक्ष केले,या सरकारने या ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षासाठी न्याय मागणार्‍या भाजपच्या 12 कर्तव्यदक्ष आमदारांना विधानसभेतून द्वेषाने निलंबित ही केले आहे,या सरकारच्या ओबीसी विरोधी नाकर्तेपणामुळे आरक्षण रद्द झाले आहे,व याचा फटका ओबीसी समाजाला बसला आहे,म्हणून भारतीय जनता पार्टी प्रदेशाच्या आदेशानुसार ओबीसी समाजाला राजकिय आरक्षण मिळावे म्हणून राज्यव्यापी ओबीसी महाआघाडी सरकार विरोधात धरणे आंदोलन व निदर्शने आंदोलनात उपस्थितांना मार्गदर्शन जेष्ठनेते आत्माराम म्हाळके,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील यांनी आपल्या भाषणात म.वि.आ.सरकार कडे ओबीसी समाजाचे राजकिय आरक्षण मिळावे म्हणून जोरदार मागणी केली,

मा.पं.स.सभापती आत्माराम म्हाळके,चंद्रशेखर पाटील,अशोक शाह,विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदिप पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राकेश पाटील,जिल्हा चिटणीस सौ.रंजनाताई नेवे,जि.प.सदस्य गजेंद्र सोनवणे,चोपडा पं.स.सभापती सौ.प्रतिभाताई पाटील,मा.उपसभापती भुषण भिल,तालुकाध्यक्ष पंकज पाटील,शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल,ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष कांतिलाल पाटील,ओबीसी मोर्चा शहराध्यक्ष सुरेश चौधरी,अनुसूचित जाती आघाडी जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर,महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ.जोत्सनाताई चौधरी,कृ.बा.स.संचालक धनंजय पाटील,सरचिटणीस हनुमंतराव महाजन,चंद्रकांत धनगर,सुनिल सोनगिरे, मा.शहराध्यक्ष रविंद्र मराठे,उपाध्यक्ष हेमंतसिंग जौहरी,प्रविण चौधरी,अजय राजपूत, युवामोर्चा अध्यक्ष प्रकाश पाटील,शहराध्यक्ष तुषार पाठक,भरत सोनगिरे,अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष अशोक बागुल,आर्थिक आघाडी तालुकाध्यक्ष नितिन राजपूत,व्यापारी आघाडी उपाध्यक्ष दीपक लोहाना, चंद्रशेखर ठाकरे,योगेश महाजन,सुभाष कोळी,भरत पाटील,शालिक धनगर,विठ्ठल पाटील,सुभाष पाटील,जितेंद्र चौधरी,अमोल पाटील,कैलास पाटील,जितेंद्र पाटील,सौ.अनिताताई नेवे, डाॅ. भारतीताई क्षिरसागर,पिंटू पावरा,सुभाष पाटील, विजय बाविस्कर,धर्मदास पाटील,अमित तडवी, एकनाथ पाटील,प्रशांत देशमुख,अनिल पाटील,दिपक चौधरी,कांतिलाल पाटील,डिंगबर पाटील, लक्ष्मण पाटील,मोतिलाल सोनवणे,नरेंद्र सोनवणे,रामलाल पाटील,आदि पदाधिकारी,कार्यकतेॅ उपस्थित होते..

Spread the love