हेमकांत गायकवाड
चोपडा-तालुक्यातील वडती येथील जि.प.प्राथमिक शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी रमजान पिंजारी उपाध्यक्ष पदी प्रतिक्षा धनगर तर सचिव पदी मोहन पिंगळे यांची नुकतीच सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर निवड दर दोन वर्षानंतर करण्यात येत असते.या समितीच्या सचिवपदी मुख्याध्यापक असतात.सदर बैठक जि.प.शाळेत संपन्न झाली असून यात आशा कोळी, सदाशिव धनगर, गायत्री कोळी,लेदा बारेला,भरत वारडे,रोनक जाकीर, सकुबाई कोळी, जयश्री कोळी,निवृत्ती बाविस्कर ,धनंजय पाटील,तेजश्वीनी कोळी यांची सदस्य पदी निवड करून कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. जाहीर झालेल्या कार्यकारणीचे मावळत्या कार्यकारिणीने यथोचित सत्कार करून पदभार दिला.सदर निवडीचे सर्वच स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.