निंभोरा येथील कमकुवत जलकुंभाची अधिकाऱ्यांनी केली पाहणी

0
13

प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर – येथील गावाला पाणीपुरवठा करणारा जलकुंभ धोकादायक स्थितीत असून सध्या स्थितीत याच जलकुंभातून गावाला पाणीपुरवठा करण्यात येत होता या संदर्भात अधिकृत असेही सन २०१४/१५या वर्षी ग्रामपंचायत देखभाल दुरुस्ती योजनेतून सुमारे दोन लाख लीटर क्षमतेचा जलकुंभ निंभोरा येथे दसनूर रोड लगत भुसावळ येथील उमेश इंटरप्राईजेस या संबंधित ठेकेदारा कडून अंदाजीत २२ लक्ष रुपये एवढा खर्च करून बांधण्यात आला होता. व २०१७ या वर्षी ग्रामपंचायतीला हस्तांतरित करुन पाणी पुरवठा सुरू करण्यात आला मात्र जल कुंभाच्या एकूण पाच कलम पैकी आतील प्रमुख सेंटरचा कॉलम मधील सळई (आसारी) बाहेर निघून मोठा आवाज झाला धोकादायक परीस्थिती पाणीपुरवठा कर्मचारी यांच्या लक्षात येताच ही वार्ता गावात समजताच एकच खळबळ उडाली गावातील रहिवाशांनी जलकुंभाकडे पाहणीसाठी धाव घेतली व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची ओरड केली संबंधित ठेकेदाराने व तत्कालीन ग्रामसेवक आणि ग्रामपंचायतिच्या दुर्लक्षपणाचा हा परिणाम आहे. घातपात करण्याच्या उद्देशाने कुणी काही केलं असेल का? अशी चर्चाही चर्चिली जात होती. जलकुंभाची तातडीने उपाय योजना करून दुरुस्ती करावी व यामुळे अनुचित घटना घडण्याची शक्यता होऊ शकते असे निदर्शनास आणून दिले. इतक्या कमी वेळेत जलकुंभ निखळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

यासंदर्भात दि.५ रोजी ग्रामपंचायतने विशेष सभा बोलवून संबंधित ठेकेदार व ग्रामीण पाणीपुरवठाचे उपअभियंता यांच्या निदर्शनास आणून दिले. असून दर्जाहिन झालेल्या या कामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल असे ठरविले आहे. नवीन जलजीवन मिशन योजनेअंतर्गत येत्या दोन दिवसात जलकुंभाचे काम सुरू करण्यात येईल असे सरपंच सचिन महाले यांनी सांगितले.

ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे यावल येथील उप अभियंता संतोष सुरवाडे व संबंधित ठेकेदार उमेश इंटरप्राईजेस चे संचालक व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामस्थ शिष्टमंडळाने जलकुंभाची पाहणी केली व या संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. यावेळी ठेकेदार उमेश चौधरी यांनी मी माझ्या स्वखर्चाने दुरुस्ती करून देईल असे मान्य केले.

याप्रसंगी ग्राम विकास अधिकारी गणेश पाटील सरपंच सचिन महाले, विवेक ठाकरे दुर्गादास पाटील, ग्रामपंचायत सदस्य सौ. संगीता राणे, सौ. मंदाकिनी बराटे मनोहर तायडे, दिलशाद शेख, ललित कोळंबे, युनूस खान, अकील खाटीक, ग्रामस्थ नितीन पाटील, प्रमोद कोंडे, राजीव बोरसे, दिलीप सोनवणे, रवी महाले राजेंद्र महाले, राहुल सोनार, कैलास चौधरी ठेकेदार उमेश चौधरी व पाणीपुरवठा विभागाचे उप अभियंता सुरवाडे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

#प्रतिक्रिया#

@ग्रामविकास अधिकारी: गणेश पाटील  गावाला सध्या स्थितीत पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था करण्यासाठी उपाय योजना करण्यात आले आहे या संदर्भात मी सर्व माहिती घेतली संबंधित सर्व कागदपत्रे ऑडिटला गेलेली आहेत.

@ श्रीराम सोनवणे ग्रामस्थ निंभोरा: यात संबंधित ठेकेदार व अधिकारी जो कोणी दोषी असेल त्यावर कारवाई होऊन गुन्हा दाखल करावा.

@ ग्रामीण पाणीपुरवठा विभाग यावल उपअभियंता संतोष सुरवाडे : मी जलकुंभ स्थळी भेट देऊन पाहणी केली व योग्य त्या कारवाईसाठी वरिष्ठांना या संदर्भात अहवाल पाठवीन. छायाचित्रात धोकादायक जलकुंभ व इन्सॅट मध्ये निघालेल्या सळई दिसत आहे.

Spread the love