यावलमधील धक्कादायक घटना; मस्करी सहन न झाल्याने चाकू हल्ला जखमीचा मृत्यू …

0
13

यावल – शहरातीलजखमीचा मृत्यू; बोरावल गेट परिसरात चेष्टा मस्करीतून केलेल्या चाकू हल्ल्यातील जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली.

प्रभाकर आनंदा धनगर (वय ५५ वर्ष) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

नेमकं प्रकरण काय?

यावल शहरातील धनगरवाडामधील रहिवाशी प्रभाकर धनगर हे बोरावल गेट परिसरातील चहाच्या स्टॉलवर बसलेले होते. या ठिकाणी उपस्थितांमध्ये चेष्टा मस्करी सुरू असताना रामा केशव ढाके (राहणार व्यास नगर, यावल) यांनी त्याच्या हातातील चाकुने प्रभाकर धनगर यांच्यावर ह्ल्ला करीत त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात धनगर हे गंभीर जखमी झाले.

जखमी अवस्थेत यावलच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तात्काळ पुढील उपचारासाठी जळगाव पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री दीड वाजेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झालं या घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक मुजफ्फर खान व पोलीस करीत आहे. दरम्यान याच प्रकरणात रामा ढाके हे देखील गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिलेली आहे.

Spread the love