प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील राजू कडू कोळी या ४८ वर्षीय प्रौढाचा सोमवार दि. ९ रोजी बामणोद व पाडळसेच्या दरम्यान झालेल्या दुचाकी व चारचाकी वाहनाच्या अपघातात मृत्यू झाला.
सोमवार दि. ९ रोजी राजू कोळी हे आपल्या पत्नी व मुलासह दुचाकी ने फैजपूर जवळील सुनोदा गावी येथे राहणाऱ्या आपल्या मुलीकडे भेटायला गेले होते. संध्याकाळी तिकडून परत येताना संध्याकाळी ६:१५ ते ६:३० वाजता बामणोद व पाडळसेच्या दरम्यान पाण्याच्या पाटाजवळ चारचाकी आयशर वाहन क्रमांक जी जे १३ ए डब्ल्यू ५१५८ ही भुसावळ कडून रावेरकडे जात असताना राजु कोळी हे आपली दुचाकी फॅशन वाहन क्रमांक एम एच १९ डी ई ३६३४ ने भुसावळ कडे येत असताना झालेल्या अपघातात चार चाकी वाहनाचा टायर राजू कोळी यांच्या मांडीवरून गेल्याने त्यांना चालणे शक्य झाले नाही. तात्काळ वाटसरूंनी त्यांना मदतीची हात दिला व त्यांना गोदावरी रुग्णालयात घेऊन गेले. परंतु रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मावळली.
मंगळवार दि. १० रोजी कुऱ्हे पानाचे येथे त्यांच्यावर शोककाळात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावाई असा परिवार आहे. सामाजिक कार्यकर्ते नारायण कोळी यांचे ते काका होत.
मुलीकडे थांबल्याने पत्नी व मुलगा वाचले
पत्नी व मुलगा मुक्कामी थांबल्याने त्यांचे जीव वाचले. राजू कोळी हे मुलीकडे गेल्यानंतर तेथे गेल्यावर मुक्कामी राहण्याचा बेत होता. पत्नी त्यांना सांगत होती की आपण परत गावी जाऊया. परंतु ते मुक्कामी राहणार होते. नंतर मात्र त्यांनी सांगितले की आपण कुऱ्हे येथे गावी परत जाऊया. परंतु घरी जाण्यास रात्र होईल म्हणून पत्नी व मुलगा यांनी नकार देत मुक्कामी राहण्याचा सल्ला दिला. व ते मुलीकडे थांबून गेले. परंतु राजु कोळी मात्र आपल्या मुलीच्या सुनोदा या गावावरून कुऱ्हे पानाचे येथील आपल्या घराकडे निघाले होते. परंतु रस्त्यात काळाने त्यांच्यावर घात केला.
गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू:
दुचाकीला धडक दिलेल्या वाहनाचा तपास लागला असून चारचाकी वाहन क्रमांक जी जे १३ ए डब्ल्यू ५१५८ या वाहन चालकावर फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.