२५ हजाराची लाच स्वीकारताना वायरमनला अटक

0
38

जळगाव – जुने वीजमीटर काढून नवीन मीटर बसविण्यासाठी २५ हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

संतोष भागवत प्रजापती (वय ३२, रा. आदर्शनगर कक्ष, जळगाव) संशयित लाचखोर वायरमनचे नाव आहे. तक्रारदार यांच्या घरी त्यांच्या आईच्या नावाने महावितरण कंपनीचे वीजमीटर आहे. त्यांचे जुनेमीटर नादुरूस्त असल्याने नवीन वीजमीटर बसविण्यासाठी तक्रारदार यांनी श्री. प्रजापती यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी तक्रारदाराला २५ हजार रुपयाच्या लाचेची मागणी केली.

यानंतर तक्रारदार यांनी याबाबत जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीची उपअधीक्षक सुहास देशमुख यांनी खातर जमा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकातील पोलिस निरीक्षक एन.एन.जाधव, अमोल वलसाडे, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील,रवींद्र घुगे, शैला धनगर, किशोर महाजन, सुनील वानखेडे, प्रदीप पोळ, राकेश दुसाणे, अमोल सूर्यवंशी, प्रणेश ठाकुर यांनी सापळा रचत श्री. प्रजापती यांना तक्रारदारकडून २५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडत अटक केली.

 

Spread the love