सुनसगाव येथे माकडाची अंत्ययात्रा !

0
41

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ भुसावळ तालुक्यातील सुनसगाव येथे वार्ड क्रमांक तीन मध्ये झाडावरून पडून माकडाचा मृत्यू झाला होता. या बाबत पत्रकार जितेंद्र काटे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली तसेच गावातील ग्रामस्थ या माकडाचा दफनविधी करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली आणि गावातील ग्रामस्थांनी विशेष म्हणजे दादाजी धुनीवाले कुटीया तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर नगरातील तरुणांनी एकत्र येऊन माकडाची गावातून अंत्ययात्रा काढली. एखाद्या मयत व्यक्तिचे ज्या प्रकारे सोपस्कार पार केले जातात. त्या प्रमाणे दफनविधी करण्यात आला. यावेळी जितू बोराडे हा आग्या होता. तर खांदेकरी अजय खरोटे, एकनाथ सपकाळे, किरण कोळी, गौरव पाटील होते तसेच सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केले

Spread the love