सुनसगाव येथे श्री दादाजी धुनी वाले पालखी सोहळा व भंडारा !

0
43

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जय श्री दादाजी धुनिवाले दरबार खंडवा सालाबादप्रमाणे यंदाही पालखी सोहळा व भंडारा अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दुपारी भंडारा करण्यात आला तर संध्याकाळी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी महिलांनी कळस व तुळशी वृंदावन घेऊन पाऊल्या खेळत मिरवणुकीत सहभाग घेतला तर रात्री जय गुरुदेव दादाजी भजनी मंडळ सुनसगाव, नशिराबाद, जळगाव व परिसरातील भजनी मंडळाचे आयोजन करण्यात आले होते.

Spread the love