हेमकांत गायकवाड
आज वडती येथे चोपडा मतदार संघाचे माजी आ. प्रा.श्री चन्द्रकांतजी आण्णा सोनवणे यांच्या वतीने वडती येथे २७५ डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.
लसीकरण करतांना सर्वांच्या सहकार्यातून शांततेत फार पडले. भांडणतंटा न् होता आणी न् कोणतेही प्रकारचा पोलीस बंदोबस्त विना. गावातून सर्व ग्रामस्थांनी व्यवस्थीत पणे लसीकरणास सहकार्य केल्याने लसीकरण मोठ्या उत्साहाने व शांततेने संपन्न झाले.
आज रोजी प्राथमिक आरोग्य उपकेन्द्र गोरगावले या अंतर्गत आज दुपारी १२ वाजेपासून वडती येथील गृप ग्रामपंचायत वडती येथील कार्यालयात लसीकरण करण्यात आले . यासाठी एकूण कोव्हिशिल्डचे २७५ डोस आणले गेले होते. यापैकी ज्यांनी दुसरा डोस घेतला असे ४५ लाभार्थी होते. तर २३० लोकांना पहीला लसीचा डोस दिला गेला. असे एकूण २७५ लसीचे डोस आज देण्यात आले आहे.
सध्या कोरोनाची तीसरी लाट येण्याचे संकेत दिले जात असून तसे बांधितांची संख्या देखील देशातून हळूहळू वाढता आलेख पहावयास मिळत आहे. याबाबत आरोग्य विभागांनी दखल घेवून प्रतिबंधीत उपाय म्हणून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सुरक्षीत अंतर ठेवणे, अशा सुचना जारी करून प्रतिबंधीत उपाय म्हणून लसिकरण जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
तसेत अनुषंगाच्या प्रयत्नाने आज वडती गावात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र गोरगावलेचे येथील वैद्यकीय अधिकारी- प्रकाश लोंमटे, आरोग्य सहाय्यक- पि.टी. कोळी, यांच्या मार्गदर्शनाखाली व तसेच प्रा.आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी उत्कृष्ट सेवा देवून यांनी सि.एच.ओ- वर्षा वाघ , आरोग्य सेवक- संजय बाविस्कर व अमित पावरा, शेवंता बारेला. यांनी लसीकरण करण्याकामी उत्तमरित्या कार्य केले.
तसेच ऑनलाइन संगणीकृत नोंदणीसाठी – ग्रा.पं.चे ऑपरेटर – रामचन्द्र कोळी , मोहसीन पिंजारी, मिलींद वाणी यांनी सहकार्य केले. तर अंगणवाडी शिक्षिका- सौ.सिंधूबाई मराठे, सौ. वच्छलाबाई पाटील, आशा सेवीका- रूपाली निनायदे, मदतनीस कोकीळाबाई पाटील माचला यांनी लसीकरण केन्द्रावर सहकार्य केले. तसेच चुंचाळे/वडती गटाचे उपसंघटक व पत्रकार ,रवीन्द्र पाटील यांच्या प्रयत्नातून व नियोजनातून हे लसीकरण करण्यात आले. तसेच शांततेत लसीकरण होण्याकामी महत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते – रवीन्द्र पाटील, सुनिल सपकाळे, ग्रा. पं. सदस्य, रवीन्द्र धनगर, ग्रामसेवक, नरेन्द्र शिरसाठ व लालचंद कोळी, कोतवाल अमीन पिंजारी, शरद मराठे आणी ग्रा.पं. शि. राजू धनगर , ग्रा.पं. शि. यशवंत पाटील- (बोरखेडा), भैय्या धनगर, तनवीर पिंजारी, व शिवसेनेचे आदी कार्यकर्ते व ग्रामस्थांनी लसीकरण केन्द्रास्थळी सहकार्य केले.