14 तासात 800 भूकंप, आईसलँडने राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली

0
14

जगाच्या वेगवेगळ्या भागात दर काही दिवसांनी भूकंप होत असतात. भूकंपामुळे झालेला विध्वंस अनेकांनी जवळून पाहिला आहे. अलिकडच्या काही दिवसांत हिंदुस्थानात दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात भूकंपाचे धक्के जाणवण्याचे प्रमाण वाढले आहे.

सर्वसाधारणपणे भूकंप एकदाच होतो किंवा भूकंपाचे धक्के एकदाच जाणवतात, मात्र युरोपातील आईसलँडमध्ये 14 तासांत 800 वेळा भूकंप झाला आहे. यामुळे या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

युरोपियन देश आइसलँड पर्टयकांसाठी आवडतीचा देश आहे. आईसलँडमधील ब्लू लगून नावाचा भाग 16 नोव्हेंबरपर्यंत पर्यटकांसाठी ते बंद करण्यात आले आहे. आइसलँडच्या हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत रेकजेनेस द्वीपकल्प परिसरात सुमारे 1400 भूकंपाची नोंद झाली आहे. यापैकी सात भूकंप असे होते की त्यांची तीव्रता रिश्टर स्केलवर चार किंवा त्याहून अधिक मोजली गेली. ब्लू लगूनमध्येही सातत्याने भूकंप होत आहेत.

रेकजेनेस हा आइसलँडच्या दक्षिण-पश्चिमेस स्थित आहे. आईसलँडची राजधानी रेक्विकपासून रेकजेनेस फार दूर नाहीये. ब्लू लगून रेकजेनेस द्वीपकल्पावर स्थित आहे आणि राजधानीपासून 50 मिनिटांच्या अंतरावर आहे. नॅशनल जिओग्राफिकने याला जगातील 25 आधुनिक आश्चर्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. भू-औष्णिक खनिज स्नानासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. हे ठिकाण मानवनिर्मित असून इथे जिओथर्मल पूल आहेत, जे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतात. ब्लू लगूनमधील पाणी हे निळेशार असून इथे आंघोळ करण्यासाठी लोकं जगाच्या कानाकोपऱ्यातून येत असतात.

आइसलँडमध्ये तीव्र हिवाळा असतो आणि इथे बोचरे वारे वाहात असतात. मात्र ब्लू लगूनचा परीसर हा वेगळा आहे. हा भाग विशिष्ट घटकांनी परीपूर्ण असा ‘स्पा’ म्हणून प्रसिद्ध आहे. असे म्हटले जाते की इथल्या पाण्यात त्वचेशी संबंधित आजार दूर करण्याची क्षमता असते. सरोवराचे पाणी निळे असून ते गरम असते. त्वचाविकार दूर होतील या आशेने माणसे इथे येत असतात.

Spread the love