न.पा.च्या नाकर्तेपणावर प्रचंड नाराजी.आमदार सौ.लताताई सोनवणे .दखल न घेतल्यास मेनरोडावर करणार ठिय्या..!

0
41

हेमकांत गायकवाड

चोपडा : शहरातील विविध नगरे हे समस्यांच्या खाईत लोटले गेले आहेत त्यांना या खाईतून हात धरून बाहेर काढण्यासाठी न.पा.मार्फत कोणी मायचा लाल उरलेला नाही अशी धारणा तयार होऊन अखेर कार्य सम्राट माजी आमदार चंद्रकांत अण्णासाहेब सोनवणे व आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या कडे नारायण नगरातील रहिवाशांनी धाव घेत एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. जवळपास संपूर्ण रहिवाशांनी गर्दी करत अण्णाकडे धाव घेतल्याने इतर काॅलन्यांमध्येही कुजबुज सुरु झाली आहे . निवेदनावर २५ ते ३० जाणकारांच्या सह्या आहेत.भविष्यात न.पा.सत्ताधाऱ्याविरोधात पावसाच्या पाण्याने निर्माण झालेल्या गढूळ पाण्याच्या डबक्यांच्या त्रासाला बळी पडलेल्यांनी स्वच्छ विकास धारेच्या मार्गाने कल धरतील असे चित्र तयार होत चालले आहे.गेल्या आठवड्यात मधूबन कालीन वासियांनी जाहीर नाराजी करत नगरपालिकेच्या नाकर्तेपणाच्या चांगल्याच चिंधड्या उडविल्या आहेत त्याच धर्तीवर आता नारायण नगरातील रहिवाशांनी समस्यांच्या नायनाट करण्यासाठी आमदार साहेबांकडे धाव घेतल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

 

या निवेदनातून विकासाचे शिल्पकार मा. सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे व कार्यसम्राट मा.प्रा. श्री. चंद्रकांतजी बळीरामजी सोनवणे (माजी आमदार घोपडा विधानसभा) यांच्याकडेजय नारायण नगर गट नं. १०२ थे रहिवासी तर्फे सुनिल भिकमचंद जैन रा. जयनारायण नगर, चोपडा जि. जळगांव यांच्या सह‌रहीवाशांनी जयनारायण नगर मधील रस्ते व गटारींची कामासाठी आमदार निधीतून निधी मिळावा यासाठी..एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

चोपडा येथील जय नारायण नगर गट नं. १०२ ही फार जुनी कॉलनी असून नगरपालिका हद्दीत आहे. आजपावेतोचा न.प. टॅक्स भरून सुध्दा व अनेक वर्षापासून अर्ज करून जीवनावश्यक सुविधांचा मागणी करून सुध्दा या कॉलनीला मुद्दामहून टाळाटाळ) करून काम करीत नाही म्हणून संपूर्ण कॉलनीचे रहिवासीची मिटींग करून एकमताने हा निर्णय करण्यात आला की, कार्यसम्राट व विकासाची गंगा आणणारे लोकप्रिय आमदार सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार श्री. चंद्रकांतजी सोनवणे यांना विनंती करून त्यांच्या विकास फंडातून आपल्या कॉलनीचे ट्रीमिक्सचे रस्ते व गटारी मिळाव्यात ही विनंती केली आहे .

 

या निवेदनावरश्री. सुनिल भिकमचंद जैन,पंकज न्याती, कल्याण पाटील, चेतन पाटील, मधुकर पाटील,मंगल पाटील, नरहरी पुंडलिक, यशवंत चौधरी, मनिष गुजराथी, संदीप जैन, बिपिन विजयचंद जैन,धीरज चव्हाण, आदींच्या सह्या आहेत.

 

मेन रोडवरील गटारीचे व रस्ता काम करण्याची मागणी

 

आज मेनरोड वरील व्यापारी बधुंनी कार्य सम्राट माजी आमदार प्रा.श्री चंद्रकांतजी सोनवणे यांना मेनरोड व गट्टारीचे काम आमदार निधितुन करून द्या. कारण चोपडा नगरपालिका हि हेतु पुरस्कर टालाटाल करती आहे. चार वर्षों पासुन अनेक अर्ज देऊन सुधा लक्ष्य देत नाहि. व व्यापारी बधुंनी श्री आण्णासाहेबाचा लक्षात अणुन दिले की चोपडा शहरात अन्नभेसळ व वजनकाटे चे अधिकारी हे हेतु पुरस्कर त्रास देत आहे. हि तक्रार केली आहे. व सोमवारी ता. 20~9~2021दुपारी ठि. 4 वाजता मेनरोड वरील व्यापारी चोपडा नगरपालिका येथे सुधा जाऊन निवेदन देणार आहे. व न.पा.ने तरीपण लक्ष्य दिले नाहितर मेनरोड वर ठिया आदोंलन करण्यात येईल हे एकमता ने निर्णय घेतला आहे.

Spread the love