मुख्यमंत्री महोदयांची भेट घालून द्या यासाठी उर्वेश साळुंखेने मंत्री महोदयांना समोर जोडले हात-पाय….
जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा प्रकल्प पाडळसरे धरण हे धरण २०ते २५ वर्षापासून अपूर्ण आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण व्हावा यासाठी बुधगाव येथील रहिवासी पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सदस्य उर्वेश साळुंखे यांने गुडघ्यावर चालून जगप्रसिद्ध मंदिर अमळनेर श्री. मंगळग्रह देवाला धरण पूर्ण करण्यासाठी साकडे घातले. या प्रसंगी मंगळ ग्रह सेवा संस्थानचे अध्यक्ष डिगबर महाले पाडळसरे धरण जनआंदोलन समिती अध्यक्ष सुभाष चौधरी, रणजित शिंदे, रामराव पवार, हिंमत कखरे आदि सर्व पाडळसरे धरण जनआंदोलन समिती सदस्य उपस्थित होते. निवृत्ती मुख्य कार्यकारी अभियंता अशोकराव पवार पाडळसे प्रकल्पांचे तांत्रिक सल्लागार प्रकाश पाटील नागपुर प्राधिकरणाचे उपसंचालक कपिल पवार उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेचे कार्यवाह प्रा. विकास पाटील आदी भाविक उपस्थित होते.
मुख्यमंत्री भेटीसाठी मंत्री पाटील यांना हात पाय जोडुन विनंती
उर्वेश साळुंखे यांनी निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण पूर्ण करावे यासाठी मुख्यमंत्री महोदय मा.ना. एकनाथजी शिंदे साहेब यांना आपल्या स्वताच्या रक्ताच्या शाईने निवेदन तयार केले आहे.
तरी हे रक्ताच्या शाईचे निवेदन उर्वेश साळुंखे हे मुख्यमंत्र्यांनाच देणार आहे. या साठी उर्वेश साळुंखे सतत मुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधत आहे व पालकमंत्री मा.ना. गुलाबराव पाटील चोपड्याचे आमदार सौ.लताताई सोनवणे यांना देखील विनंती अर्ज दिला आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी. परंतु कोणीही भेट घालून दिली नाही.
तरी आज अमळनेर येथे पाडळसरे धरण संदर्भात मंगळग्रह मंदिर येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत मदत पुनर्वसन मंत्री मा.ना. अनिलदादा पाटील यांना उर्वेश साळुंखे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट करून द्या यासाठी हात आणि पाय जोडून विनंती केली. या प्रसंगी मा. आमदार साहेबराव पाटील, स्मिता पाटील व मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.