भुसावळ – येथील श्री क्षेत्र मनुदेवी मंदीराच्या प्रांगणातील कार्तिक स्वामी मंदिर त्रिपुरा पौर्णिमेच्या निमित्ताने भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. हे मंदिर वर्षातून एकदाच कार्तिक महिन्यात कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी उघडते मात्र इतर दिवशी वर्षभर बंद राहते. कार्तिक स्वामी मंदीराचे दर्शन उघडण्या अगोदर दिवा, अगरबत्ती व वाजंत्री तयार ठेवावी लागते . दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दिवा लावलाच पाहिजे असे सांगितले. विशेष म्हणजे या कार्तिकस्वामी मंदीरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते आता दि. २७ नोव्हेंबर च्या रात्री उशिरापर्यंत हे मंदिर उघडे राहणार आहे तरी परिसरातील भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.