आयशरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

0
16

धरणगाव – शहराजवळ भरधाव आयशरच्या दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ६.३० ववाजेच्या सुमारास घडली आहे.

यावेळी नातेवाईकांची जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मोठी गर्दी होती.

मोरेश्वर लोटू अत्तरदे (वय-५०) रा.साळवा ता. धरणगाव असे माहित झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील साळवा येथे मोरेश्वर अत्तरदे तेआपल्या वडिलांसह वास्तव्याला आहे. सामाजिक कार्यकर्ते व शेतीचे काम करून ते आपल्या उदरनिर्वाह करतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून ते नातेवाईकांकडे मुंबई येथे गेले होते. गुरुवार ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ते मुंबई येथून धरणगाव येथे आले होते. दरम्यान धरणगाव येथून त्यांनी त्यांच्या दुचाकीने गावी साळवा येथे जाण्यासाठी सकाळी ६.३० वाजता निघाले. दरम्यान धरणगावच्या पुढे असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ चोपडाकडून धरणगावकडे येणाऱ्या अज्ञात आयशर वाहनाने

जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर साळवा गावातील नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. यावेळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळाले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू

Spread the love