जळगाव-शहरातील ऑर्किड हॉस्पिटल जवळ आर आर शाळेसमोरच्या रस्त्यावर आज रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने रेती रस्त्यावर येऊन रहदारीचा खोळंबा झाला आहे.
आज सकाळी ११ . ३० वाजेच्या सुमारास स्टेट बँकेकडून बी जे मार्केटकडे जाणारे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पलटी झाले अमृत योजनेसाठी चाऱ्या खोदल्या होत्या त्यामुळे त्या चाऱ्याच्या जागा भुसभुशीत झालेल्या असल्याने ट्रॉलीचे चाक चारीत रुतून पलटी झाली. असे या भागातील लोकांनी सांगितले आता ही रस्त्यावरची महापालिकेचे कर्मचारी कधी हटवून रास्ता मोकळा करतील हा खरा प्रश्न आहे. ट्रॉली पलटी झाल्यावर ट्रॅक्टरचालक ट्रॉली तशीच सोडून ट्रॅक्टर घेऊन निघून गेला आहे.
याच भागात महत्वाचे ऑर्किड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि इतरही दवाखाने , औषधांची दुकाने असल्याने तातडीच्या कामासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या लोकांनी हा मनस्ताप किती वेळ सहन करावा अशा संतप्त प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केला. हे ट्रॅक्टर जळगाव शहरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांचे असल्याचे समजते