सुनील केदार यांची आमदारकी रद्द, जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी झाली आहे 5 वर्षांची शिक्षा

0
41

सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवल्यावर त्यांच्या वकिलांकडून कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली होती. सुनील केदार हे लोकप्रतिनिधी आहेत आणि त्यामुळे त्यांना कमीत कमी शिक्षा देण्याचा युक्तीवाद त्यांनी केला होता. पण न्यायालयाने सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यासोबतच 12.50 लाख रुपयांचा दंड सुद्धा ठोठावला आहे.

हा संपूर्ण घोटाळा 152 कोटी रुपयांचा असून गेल्या 20 वर्षांपासून हे प्रकरण सुरू होते अखेर याचा आज निकाल लागला आहे. नागपूर कनिष्ठ न्यायालय (ACJM) न्यायालयाच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपींना शिक्षा सुनावली आहे.

2002 मध्ये बँकेत 152 कोटींहून अधिकचा घोटाळा उघडकीस आला होता. सुनील त्यावेळी केदार बँकेचे अध्यक्ष होते. या प्रकरणातही तो मुख्य आरोपी होता. मुंबई, कोलकाता आणि अहमदाबादमधील काही कंपन्यांनी बँक फंडातून 125 कोटी रुपयांचे सरकारी रोखे खरेदी केले होते. यानंतर या कंपन्यांनी सरकारी रोखे भरले नाहीत आणि बँकेत पैसेही परत केले नाहीत. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीआयडी) तत्कालीन उपअधीक्षक किशोर बेले हे या घोटाळ्याचे तपास अधिकारी होते. तपास पूर्ण झाल्यानंतर 22 नोव्हेंबर 2002 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. तेव्हापासून हे प्रकरण प्रलंबित होते.

सुनील केदार यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू

सुनील केदार यांना शासकीय रुग्णालयात रात्री उशिरा दाखल करण्यात आले आहे. तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्यानं केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुनील केदार यांची न्यायालयातून सेंट्रल जेलला जाण्यापूर्वी वैद्यकीय चाचणी करण्यात आली. सुनील केदार यांना तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याने अस्वस्थ वाटत होते त्यामुळे केदार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या निगराणीत केदार यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे.

अतिदक्षता विभागात उपचार सुरू

सुनील केदार यांना न्यायालयाने नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळा प्रकरणी दोषी ठरवत पाच वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यानंतर न्यायालयातून नागपूर सेंट्रल जेलला रवाना करण्यापूर्वी पोलिसांनी नियमाप्रमाणे वैद्यकीय चाचणीसाठी सुनील केदार आणि इतर आरोपींना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात नेले होते.

रुग्णालयात गेल्यानंतर केदार यांनी मायग्रेनचा त्रास असल्याने तीव्र डोकेदुखी आणि छातीत दुखत असल्याची तक्रार केली. डॉक्टरांनी इसीजी काढले असता थोडे बदल आढळून आले. हे बदल आधीचे आहे की आताचे आहेत हे डॉक्टर तपासणार आहे. तूर्तास तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत अतिदक्षता विभागात केदार यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Spread the love