सुनसगावात गावाच्या विकासासाठी महिला सरपंचासह महिला अधिकारी व पदाधिकारी एकवटले !

0
53

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील ग्रामपंचायत ची ग्रामसभा घेण्यात आली यावेळी पुरुष मंडळी रिकाम्या चर्चा करीत असताना महिला एकत्र बसून गावातील विकासा संदर्भात चर्चा करताना दिसून आल्याने एकच चर्चा सुरू होती.

येथील विविध कार्यकारी सोसायटी च्या आवारात ग्रामसभा घेण्यात आली यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यावेळी अनेक पुरुष सभा सुरू असताना आपले प्रश्न घेऊन थेट सरपंच व ग्रामसेविका यांच्या समोर जात होते तर महिला जागेवर बसून होत्या. वास्तविक पाहता सुनसगाव येथे सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी महिलाच आहेत त्यात सरपंच सौ काजल कोळी व महिला सदस्य वैशाली युवराज पाटील, रत्नमाला विकास पाटील, शोभा रामचंद्र शिरसाळे, गायत्री राहूल नारखेडे, रंजना सुधाकर पाटील, ग्रामसेविका प्रतिभा तायडे,तलाठी सुनिता वळवी, विज वितरण कंपनीच्या अभियंता देवयानी शेटे, प्राथमिक शाळा मुख्याध्यापक व शिक्षिका, बचतगटाच्या सीआरपी उज्वला कंकरे , प्रतिभा पाटील , लताबाई प्रमोद सपकाळे (गोंभी), वर्धीनी संगीता सपकाळे, वैशाली प्रमोद पाटील (पोलीस पाटील गोंभी), पोष्ट मास्टर आमोदकर मॅडम, आरोग्य सेविका विजया पाटील, तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस चारुशीला बेंडाळे, शोभा चौधरी, संगीता कंकरे, आशा चौधरी, पल्लवी बाविस्कर, मोहिनी पाटील, आशासेविका ज्योती पाटील व सुनिता काटे, महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी संगीता काटे, सुनिता कंकरे, सुनंदा कंकरे , पशुसखी निशा पाटील अशा सर्व महिला आहेत. विशेष म्हणजे गावात ४० ते ४५ महिला गट आहेत आणि जर या सर्व महिला एकत्र आल्या तर गावाचा कायापालट झाल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे गावाच्या विकासासाठी काय करता येईल या बाबत या सर्व महिलांनी एकत्र येऊन चर्चा केली. याच ग्रामसभेत एकीकडे मात्र पुरुष मंडळी वायफळ गप्पांमध्ये गुंतलेले दिसले त्यामुळे महिला सरपंचासह महिला ग्रामपंचायत सदस्य व महिला अधिकारी व कर्मचारी तसेच पदाधिकारी एकत्र आले तर प्रत्येक योजना गावात राबविण्यात येऊ शकते आणि गावाचा सर्वांगीण विकास होऊ शकतो असे या महिलांचा गोतावळा पाहून वाटत होते.

Spread the love