ममुराबाद विदगाव रस्त्यावर दुचाकीची रिक्षाला जोरदार धडक; गुन्हा दाखल

0
15

ममुराबाद -:प्रवाशी रिक्षाला समोरून येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने रिक्षातील प्रवासी जखमी झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. ही घटना जळगाव ममुराबादरोडवर घडली असून याप्रकरणी दुचाकीचालकाचा विरोधात जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गोकुळ हनुमंत पाटील (वय ३२, रा. वडगाव बुद्रुक ता. चोपडा) हे रिक्षा चालक आहे. १९ सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजता ते प्रवासी भास्कर लिलाधर साबळे (वय ४०) यांना (एमएच १९ ई ८७८०) ने जळगाव ते ममुराबाद रोडवरून जात असताना समोरून येणाऱ्या मोटरसायकल (एमएच १९, ६२५२) याने भरधाव वेगात येऊन रिक्षाला जोरदार धडक दिली.

यात रिक्षामधील प्रवासी भास्कर साबळे हे जखमी झाले आहे. याप्रकरणी रिक्षाचालक गोकुळ पाटील यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दुचाकीधारक प्रमोद गोपाळ सरदार रा.गोरगावले ता.चोपडा याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलिस नाईक बापू कोळी करीत आहे.

Spread the love