चोपडा हादरले ! तरुणीवर आधी एकाने, नंतर तिघांनी केला आळीपाळीने बलात्कार, चौघे संशयित नराधमांना अटक

0
13

जळगाव – जिल्ह्याला हादरवून सोडणारा अत्याचारा प्रकार समोर आला आहे चोपडा तालुक्यातील एका गावातील १८ वर्षीय तरुणीवर आधी एकाने व नंतर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली.

या प्रकरणी संशयित चार नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तालुक्यातील एका गावात गफूर गबू तडवी (३३) याने २ जानेवारी रोजी दुपारी तरुणीच्या घरात घुसून धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. एवढेच नाही, तर या तरुणीला यावल तालुक्यात भेटायला ये; नाहीतर, ठार मारण्याची धमकी दिली. घाबरून ही तरुणी यावल येथे पोहोचली. त्यावेळी बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी प्रतीक राजेंद्र कोळी (२०), पंकज बुधा कुंभार (२६) व अमोल शत्रुघ्न कोळी (२३) या तीन जणांनी दारूच्या नशेत तरुणीला आधी सहानुभूती दाखवली.

नंतर जिवे मारण्याची धमकी देत आळीपाळीने बलात्कार केला. ४ जानेवारी रोजी रात्री १२ ते पहाटे तीन वाजेदरम्यान ही घटना घडली. या प्रकारानंतर युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून वरील चारही जणांविरुद्ध अडावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक गणेश बुवा हे करीत आहेत.

Spread the love