स्नेहसंमेलनातूनच घडतात कलाकार – प्राचार्या जयश्री पुराणिक

0
14

विवरे येथील बेंडाळे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – राजेंद्र महाले

रावेर – तालुक्यातील विवरे येथील ग. गो. बेंडाळे हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन दि.५ रोजी उत्साहात संपन्न झाले. यात ३५० विद्यार्थ्यांनी आपले कला गुणांचे सादरीकरण केले.

यावेळी व्यासीठावर कमलाबाई गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्या सौ जयश्री कुलकर्णी पुराणिक, मधुस्नेह परिवाराचे समन्वयक विवेक ठाकरे, निंभोरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी हरिदास बोचरे, रावेर विकासोचे चेअरमन तुषार मानकर,शिक्षण विकास मंडळ विवरे चेअरमन धनजी लढे,सचिव शैलेश राणे,अध्यक्ष मार्तंड भिरूड, संचालक रमेश पाचपांडे, गोपाळ राणे, दिलीप राणे, केशव राणे, निंभोरा ग्रामपचायत सदस्य दस्तगीर खाटीक, मुख्याध्यापक पी. एच. वायकोळे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हर्षाली बेंडाळे, पर्यवेक्षक आर टी कोल्हे केंद्रप्रमुख दिपक सोनार उपस्थित होते.प्रास्ताविक शिक्षण विकास मंडळ विवरे सचिव प्रा शैलेश राणे तर सूत्रसंचालन सौ नीलिमा नेमाडे यांनी केले.

प्रसंगी प्राचार्या जयश्री पुराणिक यांनी सांगितले की, जीवनातील यशाचे बीज आपल्या शैक्षणिक आणि सहशालेय उपक्रमातून रुजविले असतात. तसेच शाळेतील नृत्य नाट्य यात केलेले अभिनय सशक्त असल्यास चित्रपट सृष्टीतील कलाकार घडतात असेही प्राचार्या जयश्री पुराणिक यांनी सांगितले. ग्राम गौरव चे संपादक विवेक ठाकरे यांनी सांगितले की, शाळा हे व्यक्ती विकासाचे महत्त्वपूर्ण मध्यम आहे. स्नेसंमेलनातून गुणवान आणि सुजाण नागरिकतेची शिकवण देखील रसिकांना मिळत असल्याने प्रतिपादन ठाकरे यांनी सांगितले.

तसेच सपोनी हरिदास बोचरे, विवेक ठाकरे, यांनी देखील यावेळी मनोगत व्यक्त केले. स्नेसंमेलनात प्राथमिक शाळेच्या १७ व माध्यमिक शाळेतील २२ कार्यक्रम सादरीकरण झाले.यात ३५० विद्यार्थी सहभागी झाले होते.

 

Spread the love