प्रतिनिधी – राजेंद्र महाले
रावेर – निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथे दिनांक 10 /01/2024 रोजी सकाळी १० वाजता ग्रामपंचायत कार्यालयासमोर केंद्र शासनाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विकसित भारत संकल्प रथयात्रेच्या रथाचे आयोजन करण्यात आले.
रथाच्या माध्यमातून केंद्राच्या विविध शासकीय योजनांची माहिती या मार्फत देण्यात आली याप्रसंगी गावातील सरपंच श्री सचिन महाले, उपसरपंच रंजना पाटील ग्रामसेवक गणेश पाटील ग्रामपंचायत सदस्य मनोहर तायडे दिलशाद शेख, अमोल खाचणे, सौ मंदाकिनी बराटे, सौ सायराबी युनुस खान, सौ .संगीता राणे, सौ. मीनाज खाटीक,प्रशांत पाटील, विविध संस्थांचे पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ तसेच भारत गॅस वितरक कर्मचारी सुनील कोंडे, भाजपा पदाधिकारी रवि महाले, पाटील आशा वर्कर बचत गट सदस्य, सी.आर.पी आरोग्य विभागाचे कर्मचारी एम.पी .डब्ल्यू व इतर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी निलेश भंगाळे राहुल महाले ललित दोडके आणी रथाचे प्रतीक श्री सुरेश चव्हाण संजय चावला उपस्थित होते.