गोजोरे शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी भागवत कोळी!

0
41

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या २०२३/२४ या वर्षासाठी शाळा व्यवस्थापन समितीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली यावेळी अध्यक्षपदी भागवत विश्राम कोळी उपाध्यक्ष जितेंद्र रामदास कोळी, सदस्यपदी राजेंद्र विश्वनाथ सपकाळे, गणेश वसंत पाटील, नारायण सुखदेव पाटील, धनराज संतोष वाघ कल्पना ज्ञानदेव दोडे, सोपान शिवराम कोळी, भूषण युवराज ठाकरे, लक्ष्मण दगडू तळेले, कैलास कडू चिमणकर, रेखा सोपान कोळी, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी आशा दत्तू दोडे, ज्योस्त्ना मोहन तळेले, शिक्षण तज्ञ नंदू तुळशीराम पाटील, सदस्य सल्लागार उल्हास रामदास ढाके, शिक्षक प्रतिनिधी सौ शोभा भागवत चौधरी, मुख्याध्यापक सचिव किरण आनंदा बावस्कर, अशी निवड करण्यात आली.

यावेळी सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचा सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे अध्यक्ष भागवत कोळी यांनी सांगितले आहे.

Spread the love