रावेरमध्ये रामलल्लाच्या मिरवणुकीत दगडफेक, १०-१२ जण ताब्यात

0
19

रावेर – अयोध्यामधील राम मंदिरात मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर शहरातून रविवारी (दि.२१) सायंकाळी निघालेल्या शोभायात्रेवर कारागीरवाडादरम्यान दगडफेक झाली. दगडफेकीत कोणीच जखमी झाले नसल्याचे समोरच्या येत आहे. मिरवणूक तात्काळ बंद करून शहरही बंद झाले. पोलिसांनी रात्री उशिरापर्यंत एका गटातील १०-१२ जणांना ताब्यात घेतले असून, शहरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी रात्री येते भेट देत पाहणी केली. सोबतच नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले. स्थिती आता नियंत्रणात आहे. येथे सायंकाळी पाचला महालक्ष्मी मंदिरापासून सुरू झालेली शोभायात्रा प्रमुख मार्गावरून कारागीरवाड्याकडे आली. वळणावर भोईवाडाकडे जात असतानाच मुस्कान पण सेंटरजवळच्या एका अरुंद बोळातून शोभायात्रेवर पाच-सहा युवकांनी दगडफेक केली. यामुळे मिरवणुकीत पळापळ झाली.

या वेळी महिलांसह सुमारे ४-५ हजार भाविक मिरवणुकीत सहभागी झाले होते. अवघ्या पाच मिनिटांमध्ये सर्वीकडे पळापळ झाली. दगडफेक होऊन काहीतरी अघटित झाल्याची बातमी पसरताच संपूर्ण शहरातील दुकाने आणि व्यवहार बंद करण्यात आले. मिरवणूक अर्धवट सोडून द्यावी लागली. अखेर काही कार्यकर्त्यांनी मोठ्या राम मंदिरात जाऊन आरती करून मिरवणूक पूर्ण केली.

फैजपूर विभागाच्या पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी रात्रीच दगडफेक केलेल्या गल्लीत शिरून काही युवकांना दगडांसह अटक केली. यात अनेकजण बाहेरून कुलूप लावून आत लपून बसलेले संशयितही होते. येथे नव्यानेच रुजू झालेल्या सहाय्यक पोलिस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी तत्परतेने व कठोरपणे परिस्थिती हाताळणी व नियंत्रणात आणली. रात्री उशिरा पोलिसांनी ‘ऑपरेशन कोंबिंग’ करीत आणखी काही जणांना ताब्यात घेतले आहे.

Spread the love