कथा प्रवक्ते – हभप डालेंद्र महाराज
प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील कै डिगंबर तुकाराम भारंबे यांच्या पुण्यस्मरणार्थ त्यांचे पुत्र नितीन भारंबे यांनी श्रीमद् भागवत कथा सप्ताहाचे आयोजन केले आहे.
या सप्ताहात कथा निरुपण हभप डालेंद्र महाराज आसोदा हे आपल्या मधुर वाणीतून कथा सांगत आहेत.
या सप्ताहात दररोज सकाळी काकडा आरती , विष्णू सहस्त्रनाम , कथा व संध्याकाळी श्रीहरी पाठ असा दैनंदिन कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे नातू हभप डालेंद्र महाराज हे आजोबा यांच्या पुण्यस्मरणार्थ कथा प्रवक्ते असून हभप डालेंद्र महाराज यांच्या मातोश्री व आजोबा आजी, मामा मामी, व आप्तेष्ट नातेवाईक हे कथा श्रवण करीत आहेत त्यामुळे या सप्ताहाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.









