प्रतिनिधि – अमीर पटेल
यावल – छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य सप्ताह निमित्त जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न आज दिनांक 20 2 2024 रोजी यावल शहरातील नगरपालिकेच्या साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल येथे स्वराज्य सप्ताह निमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे अवचित साधत जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेचे आयोजन श्री छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन व राष्ट्रवादी विद्यार्थ्यी काँग्रेस पक्ष जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेत असंख्य विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला या स्पर्धेचे बक्षीस वितरण मुख्याध्यापक शाळेचे सन्माननीय एम के पाटील छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशन चे अध्यक्ष ॲड देवकांत बाजीराव पाटील, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार कार्यकारी चे व्हाईस चेअरमन नरेंद्र सोनवणे शिवरत्न फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर माळी छत्रपती शिवाजी महाराज फाउंडेशनचे संचालक विनोद पाटील नरेंद्र शिंदे, हेमंत कोळी, नयन कंराडे आदींच्या प्रमुख उपस्थितीत तसेच शाळेतील उपमुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी सर्व सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी कार्यक्रमात उपस्थित होते स्पर्धेचा विषय रयतेचे राज्य शिवरायांच या विषयावर निबंध लिहायचा होता त्यात प्रथम द्वितीय तृतीय आणि तीन उत्तेजनार्थ बक्षीस काढण्यात आले ते पुढील प्रमाणे प्रथम क्रमांक पोर्णिमा महेश पाटील, द्वितीय क्रमांक निलम सुंदरसिंग कुशवाह, तृतीय क्रमांक मनाली दिपक पाटील या विद्यार्थ्यांनी व तीन उत्तेजनार्थ तर बाकी सर्व विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.