चोपडा – पुणे बसमध्ये सापडला सव्वा लाखाचा गांजा, कोपरगाव पोलिसात गुन्हा दाखल 

0
13

चोपडा – पुणे या बसमध्ये सुका गांजा असलेली बेवारस बॅग आढळून आली. या बेवारस बॅगची कोपरगांव पोलिसांनी तपासणी केली असता त्यात सुमारे 1 लाख 22 हजार रुपये किमतीचा साडे बारा किलो गांजा आढळून आला. चोपडा-कोपरगाव दरम्यान आरोपीने बॅग ठेवली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे.

याप्रकरणी कोपरगाव बस आगाराचे अविनाश विष्णुपंत गायकवाड (48) सहाय्यक वाहतूक निरीक्षक कोपरगाव आगार ओमनगर कोपरगाव येथील रहिनासी आहेत. त्यांनी कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली असून तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेत कायदेशीर कारवाई केली. पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता चोपडा पुणे बस कोपरगाव बस आगारात आली. त्यावेळी त्या गाडीत बिघाड झाल्याने वाहकाने ती गाडी कामासाठी कोपरगाव डेपोत घातली. त्यानंतर तिथे गाडी पंचर झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे गाडीच्या कामाला वेळ लागणार असलेले वाहकाने सर्व प्रवाशांना दुसऱ्या गाडीने बसून दिले. तीन-साडेतीन वाजता सर्व प्रवाशांना बसून दिल्यानंतर गाडीत एक बॅग राहिल्याचे वाहकाच्या लक्षात आल्याने त्यांनी चौकशी केली परंतु कोणीही त्या ठिकाणी आढळले नाही. त्यांनी ही गोष्ट आगारप्रमुखांच्या कानावर घातली गाडी डेपो मध्ये घातल्याचे पाहून अज्ञात आरोपीने भितीपोटी त्याने अंमली पदार्थ गांजा असलेली राखाडी रंगाची बॅग बसमध्ये सोडुन निघुन गेला आहे. शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत दाते हे पुढील तपास करीत आहे

Spread the love