हेमकांत गायकवाड
मा. जिल्ह्याधिकारी आपणांस विनंती करते कि, माझ्या चोपडा मतदार संघात अत्यंत कमी पर्जन्यमान असल्याने जिरायती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यात पावसाच्या खंडामुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेली असून उडीद, मुग पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे.
तसेच माहे ऑगस्ट महिन्यात झालेल्या सततच्या पावसाने बागायती कापूस पिकांचे देखील नुकसान झालेले आहे.
तरी या बाबींचा विचार करता तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकन्यांना नुकसान भरपाई मिळावी.