हेमकांत गायकवाड
चोपडा :- 27 सप्टेंबर 2021 रोजी ज्ञानेश्वरी जयंती दिवस म्हणून चोपडा येथे संपन्न करण्यात आला. श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज चोपडा व महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा तर्फे श्री संताजी जगनाडे महाराज मंदिरावर श्रीराम नगर चोपडा येथे ज्ञानेश्वरी या ग्रंथाचे पूजन करण्यात आले. संजय जगताप यांच्या यांचे यांचे हस्ते सपत्नीक पूजन करण्यात आले. त्याच बरोबर शशिकांत सुभाष चौधरी यांचेही हस्ते सपत्निक पूजा करण्यात आली. ज्ञानेश्वरी या ग्रंथाबद्दल ह-भ-प गोपीचंद महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले. आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की संत ज्ञानेश्वर महाराज यांनी गीता हा ग्रंथ अत्यंत सोप्या भाषेत सादर केला. ज्ञानेश्वरीचे प्रत्येक ओळी हीच जीवनाला कलाटणी देणारी आहे. आपण सर्वांनी ज्ञानेश्वरीचा एक तरी ओळीचा अनुभव घ्यावा. मूर्ख् माणूस सुद्धा ज्ञानेश्वरीच्या अनुभवाने ,वाचनाने ,पठणाने ज्ञानी होऊ शकतो . त्यामुळे ज्ञानेश्वरीचे पारायण करणे अत्यंत जरुरीचे आहे. यावेळी संजय चौधरी , नंदू चौधरी, के डी चौधरी, देवकांत चौधरी, प्रकाश चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी आदी अनेकांची उपस्थिती होती.