मराठी शाळा गोजोरे येथे दप्तर वाटप !

0
46

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोजोरे येथे नुकताच शालेय दप्तर वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे दिलीप सूर्यवंशी साहेब (सेवानिवृत्त पोलिस उप अधीक्षक) विशाल पाटील एपीआय (तालुका पोलीस स्टेशन, भुसावळ) मधुसूदन हरी वायकोळे (उद्योजक , जळगाव ) जितेंद्र सपकाळे (आदिवासी कोळी आंदोलन समन्वय समिती प्रमुख जळगाव ) आर्या चौधरी (उद्योजक , समाजसेवक ) या मान्यवरांच्या उपस्थितीत दप्तर वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी गोजोरे गावाच्या सरपंच सौ नंदा सपकाळे व लक्ष्मण सपकाळे , उपसरपंच चंद्रकांत पाटील , शिवाजी पंडित पाटील (व्हा. चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती), मोहन पाटील (ग्रामसेवक) परशुराम राणे सर, योगेश चौधरी (माजी सरपंच ), रवि कोळी (शालेय व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष) यांचे अनमोल सहकार्य लाभले तसेच ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भागवत कोळी (शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष) जितू कोळी (उपाध्यक्ष ), उल्हास ढाके शिक्षण तज्ञ नंदू पाटील ,राजेंद्र सपकाळे , नारायण पाटील , धनराज वाघ , तसेच समितीचे इतर सर्व सदस्य सदस्या तानाजी पाटील जि प शाळा गोजोरे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद

युवा क्रांती अभ्यासिका गोजोरे उपस्थित होते. यावेळी गजानन पाटील, प्रविण दोडे,बंटी दोडे, राजेश भुरे, योगेश चौधरी, सुनिल वारके, भुषण तळेले, राहुल पाटील, भुषण चौधरी, गणेश दोडे फौजी, निलेश तळेले, ज्ञानेश्वर दोडे यांनी व भागवत कोळी आणि परशुराम राणे यांनी देणगी देऊन दप्तर वाटप करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थी व पालकांनी या आयोजकांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love