गुरुवर्य हभप भरत महाराज यांना पैठणचा वारकरी रत्न पुरस्कार!

0
46

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – श्री क्षेत्र श्री कुंडलेश्वर भगवान येथील सदगुरू झेंडूजी महाराज संस्थान चे मुख्य सेवक गुरुवर्य हभप भरत महाराज यांना शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज पैठण येथील वारकरी रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

हभप भरत महाराज यांनी घालून दिलेला आदर्श तसेच वेळोवेळी संस्थान साठी घेतलेले निर्णय व टिकवून ठेवलेली परंपरा यामुळे आज श्री क्षेत्र कुंडलेश्वर भगवान चे नाव निघत आहे व वारकरी संप्रदायाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी हभप भरत महाराज सदैव तत्पर आहेत. हा पुरस्कार मिळाल्याने हभप भरत महाराज यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Spread the love