वडती ग्रामपंचायतीचा एक पाऊल पुढे उपक्रम : ग्रामसेवकांच्या समय सुचकतेने डेंग्यूला अटकावसाठी गावात फवारणी!

0
58

हेमकांत गायकवाड

चोपडा: तालुक्यातील वडती येथील ग्रामपंचायतने सध्या एक पाऊल पुढे असा उपक्रम राबविला आहे.सध्या परतीच्या पावसाने थैमान घातले असून वातावरण बदल होऊन ते दुषित झाले आहे.त्यामुळे डेंग्यू या आजाराने तालुक्यातील काही गावात डोके वर काढले आहे या बाबीचा गंभीरतेने विचार करून व समय सुचकता पाळत येथील ग्रामसेवक नरेंद्र शिरसाठ यांनी संपूर्ण गावात फोगमशिनने फवारणी केली. त्यांच्या व सरपंच यांच्या समय सुचकतेमुळे डेंग्यू आजाराला अटकाव करण्यासाठी त्यांचा हा प्रयत्न नक्कीच फायदेशीर ठरेल असे मत नागरिकांनी खान्देश अस्मिता न्यूज शी बोलतांना व्यक्त केले.गावात डास,मच्छर या पासून होणा-या आजारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वडती गृप ग्रामपंचायतीने स्वमालकीचे ‘धुरयंत्र’ घेत आरोग्याच्या बाबतीत एक पाऊल पुढे टाकले आहे.विविध प्रकाराचे आजार पसरविणाऱ्या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावात औषध फवारणी केली जात आहे.

खरं तर आरोग्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला परीसर स्वच्छ ठेवला पाहिजे.ग्रामपंचायत काळजी घेईलच परंतु गावाचे नागरिक म्हणून आपण देखील या मोहिमेत भाग घेतला पाहिजे तरचं डेंग्यू व अन्य आजारांवर मात करता येईल हे देखील तेवढेच सत्य आहे.निव्वळ ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांची ही जबाबदारी नसून या मोहिमेत लोक सहभाग हा महत्वाचा आहे.ग्रामसेवक यांनी हा उपक्रम राबवून वडतीकरांसाठी एक उत्तम असे पाऊल उचलले आहे. डेंग्यूच्या बाबतीत जनजागृती होणे देखील तेवढेच गरजेचे आहे आणि ते जाणून घेणे हे देखील सुरक्षासाठी प्रत्येक नागरीकांचे काम आहे.डेंग्यूच्या लक्षणांमध्ये रुग्णाला ताप येणे, अंगावर लाल पुरळ उमटणे, डोळ्यामागील भाग दुखणे, तसेच सांधे व शरीरदुखी ही लक्षणे दिसतात.तसेच मलेरीयामुळे थंडी,ताप हे लक्षणे पहावयास मिळतात त्यामुळे अशी लक्षणे निदर्शनास आल्यास आरोग्य विभाग यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.याबाबत खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने देखील धूर फवारणी ही दर दोन ते तीन दिवसांनी केली पाहिजे अशीही अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

याप्रसंगी सरपंच सौ.मनिषा भिल्ल,ग्रा.पं. सदस्य रविंद्र धनगर,ग्रामसेवक नरेंद्र शिरसाठ, ग्रा.पं.रोजगार सेवक किशोर पाटील,ग्रा.पं.शिपाई राजू धनगर,यशवंत पाटील,भैय्या कोळी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Spread the love