चोपडा येथे ओबीसी परिषदेची बैठक संपन्न..

0
42

हेमकांत गायकवाड

चोपडा:: 25 सप्टेंबर रोजी होणाऱ्या ओबीसी हक्क परिषदेच्या कार्यक्रम पूर्वी नियोजित बैठक जिल्हाभरातील तालुका पातळीवर सुरू आहेत. सुप्रीम कोर्टाने ओबीसींचे राजकीय अतिरिक्त आरक्षण रद्द केलं यासंदर्भात ओबीसी आरक्षण पूर्वनियोजित ठेवावं व ते रद्द करू नये त्यासंदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जळगाव या ठिकाणी ओबीसी नेते छगन भुजबळ धनंजय मुंडे आमदार कपिल पाटील तसेच ओबीसी हक्क परिषदेतील गटनेते यांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी हक्क परिषद आयोजित केलेली आहे. या ओबीसी हक्क परिषद परिषदेच्या पूर्वनियोजित बैठक ही चोपडा येथे संपन्न झाली. या बैठकीसाठी समस्त ओबीसी वर्गातील सर्वसामान्य प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते. व्यासपीठावर इंदिरताई पाटील बैठकीचे अध्यक्ष म्हणून तर जळगाव येथील संजय पवार,शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे,करीम सालार, एजाज मलिक,चहार्डी येथील डॉ.सुरेश पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनकरराव देशमुख,माजी पंचायत समिती सभापती गोपाल सोनवणे,मधुकर पाटील, शिंदे तात्या, प्रा. प्रदीप पाटील, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी चोपडा तालुक्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, मनोज पाटील आदी मान्यवर चोपडा तालुक्यातून उपस्थित होते. बैठकीचे सूत्रसंचालन अडावद येथील लक्ष्मण पाटील,प्रास्ताविक प्रा.प्रदीप पाटील तर आभार एन एस यु आय चे चेतन बाविस्कर यांनी केले.बैठक यशस्वितेसाठी प्रकाश पाटील, भुषण पाटील,अमजद कुरेशी,जहांगीर पठाण,रमाकांत सोनवणे,सुधाकर महाजन,सोहन सोनवणे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love