गोंभी येथे श्री भैरवनाथ महाराज यात्रा व बारा गाड्या !

0
46

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील गोंभी येथे दि.३१ मार्च रोजी श्री भैरवनाथ महाराज यात्रा आयोजन करण्यात आले असून बारा गाड्या भगत विजय कोळी हे ओढणार असून बगले राजू कोळी व महेंद्र पाटील हे आहेत. या यात्रेत खेळणी, मिठाई, व खाद्यपदार्थ तसेच पाळणे असतात.

या गावातील सर्व नागरीक शांततेत यात्रा पाडण्यासाठी प्रयत्न करतात तसेच रात्री करमणूकीसाठी लोकनाट्य तमाशा चे आयोजन करण्यात आले असून परिसरातील नागरिकांनी शांततेत यात्रेचा आनंद घ्यावा असे आवाहन गोंभी येथील ग्रामस्थांनी केले असून यात्रा शांततेत पार पाडण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी तसेच पोलीस पाटील बंदोबस्त ठेवणार असल्याचे समजते.

Spread the love