रावेर तालुक्यात चार एकर गांजाच्या शेतात पोलिसांचा छापा

0
18

जळगाव –  तालुक्यातील लालमाती सहस्त्रलिंग जवळ चार एकरमध्ये गांजा पेरलेल्या शेतात पोलिसांनी छापा टाकला आहे याप्रकरणी रावेर पोलिसांनी बुधवार (दि.१०) रोजी रात्री उशिराने गुन्हा नोंद करण्यात आला.

या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील पाल जवळ असलेल्या लालमाती सहस्त्रलिंग शिवारामध्ये चार एकर मध्ये गांजाची शेती होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिसांनी रात्री या ठिकाणी टाकलेल्या गांजाची झाडे जप्त केली आहेत. बुधवार (दि.१०) रात्री उशिरापर्यंत येथील झाडांची मोजमाप सुरू होते. या प्रकरणी रावेर पोलिसात पुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. यापूर्वी सुद्धा स्थानिक गुन्हे शाखेने एका ठिकाणी छापा टाकून मक्याच्या शेतातून गांजाची झाडे जप्त केलेली आहेत. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपूर्णा सिंग, तहसीलदार बंडू कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल घटनास्थळी आपल्या पथका सोबत असून याबाबत उशीरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. यावरून आदिवासी भागात व ज्या ठिकाणी पोलीस सहज लक्ष ठेवू शकत नाहीत. अशा भागांमध्ये चोरीने गांजाची शेती करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे धक्कादायक बाब समोर येत आहे.

 

Spread the love