कार्तिकीचे आतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

0
43

चोपडा : येथील श्री अनंत मोतीलाल चौधरी यांची सुकन्या कुमारी कार्तिकी हीणे टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत अद्वितीय यश संपादन केले. भारतातर्फे आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. त्याबद्दल तिचे चोपडा तेली समाजातर्फे अभिनंदन करण्यात आले. 29 सप्टेंबर 2021 रोजी श्री संताजी जगनाडे महाराज मंदिर श्रीराम नगर चोपडा येथे समाज कार्यकर्त्यांच्या बैठकीत तिचे अभिनंदन करण्यात आले. तिला शुभेच्छा देण्यात आल्या. तिच्यासोबत अष्टविनायक स्पोर्ट्स क्लब च्या आणखी दोन विद्यार्थिनी यांचीही निवड करण्यात आल्याने त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवळ झालेल्या खेळाडूंचेही अभिनंदन करण्यात आले .यावेळी संस्थेचे अध्यक्ष के .डी. चौधरी, उपाध्यक्ष टी .एम. चौधरी, नारायण चौधरी ,गोपीचंद चौधरी ,देवकांत चौधरी, महेंद्र चौधरी, प्रशांत चौधरी, गोरख चौधरी ,ज्ञानेश्‍वर नेरकर, आबा चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the love