पाळधी शिवारात गावठी हातभट्ट्यांवर पहूर पोलीसांची धाड

0
32

पहुर – जामनेर तालुक्यातील पाळधी शिवारात पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्या पथकाने गावठी हातभट्ट्यांवर धाड टाकून कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, येथून जवळच असलेल्या पाळधी गाव शिवारातील वाघूर नदीकाठी ईश्वर झिप्रू भोई,कैलास झिप्रू भोई यांचे गावठी हातभट्टीवर कारवाई करून अंदाजे बाराशे लिटर कच्चे रसायन व इतर साहित्य जागीच नष्ट केले. या कारवाईमुळे पाळधी गावात खळबळ उडाली आहे. पहूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय सुस्ते, पोलीस कॉन्स्टेबल ढाकरे ,गोपाल माळी, राहुल पाटील ,हेमंत सोनवणे यांनी ही कारवाई केली.सदर कारवाई मुळे पहूर पोलिसांचे कौतुक होत आहे.

Spread the love